बेल्जियम मधला मुक्काम संपत आला. जाण्यापूर्वी करण्याची कितीतरी कामं शिल्लक आहेत. डच कथांचा अनुवाद, जुन्या डच क्लासमेट्सच्या भेटी, जवळच आहेत; बघुया कधीतरी असं म्हणत बघायची राहून गेलेली ठिकाणं इथपासून ते अमुक इतके वजन कमी करणं या मोठ्ठ्या कामापर्यंतची लिस्ट भलीमोठी आहे !
एकीकडे आवराआवर सुरू झालीये. खरं तर अजून डोक्यातच. फेकून देताना वाईट वाटणार नाही असे कपडे, भांडी, लेकीची खेळणी डोक्यात वेगळ्या कप्प्यात जमा होतायत. चांगल्या, अजून बरेच दिवस वापरता येतील अशा वस्तू भारतात तर नेता येणार नाहीत. इथलेच नवे मालक शोधत आहेत. भारतीय किंवा टिपिकल बायकी हावरटपणाने साठवलेले मसाले नि इतर किराणा सामान पण फेकण्याएवढा माज माझ्यात नाही. ते पण कोणाला दिले तर आवडतील असे अत्यंत महत्वाच्या विषयावर सतत चिंतन सुरू झाले आहे.
पुस्तकं जमा करण्याची हौस आता अंगावर येतेय. १२० किलो मध्ये कपडे, पुस्तकं आणि इतर वस्तू कशा बसणार ! हातात वाचायला म्हणून घेतलं त्या पुस्तकाच्या वजनाचा अंदाज आपोआप घेतला जातोय ! लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर जुनी वह्यापुस्तके रद्दीवाल्याला मोजून देताना अमुक किलो रद्दी असा हिशेब व्हायचा. आकडा वाढला की आनंद व्हायचा. आता या पुस्तकांचे वजन कमी कमी भरू देत असं सारखं वाटतंय.
बाकी इथून निरोप घेताना विशेष वाईट वाटणार नाही. अगदी एखादी मैत्रिण सोडली तर ज्यांना फार मिस करेन असे कोणी नाही. इथे आल्यावर भारतातली मंडई मिस केली तसे खालचे दलहेज किंवा अल्दी हे सुपरमार्केट मिस् करेनसं वाटत नाही.
मग काय मिस करेन इथलं.. आत्ता ज्याला खूप खूप कंटाळलेय तो एकांत मिस् करेन. थंडीत झपझप चालत सगळीकडे भटकणे आणि उन्हाची आठवण काढणे मिस करेन. काहीही अडल्यासारखं वाटलं तरी नेटवर धाव घेणं मिस करेन. फार्मविले मिस करेन ! इथे दर शनिवारी बाजारात भाजी पासून माशांपर्यंत खरेदी करणारी उत्साही गर्दी मिस करेन. चर्चची घंटा आणि आमच्या गावातले प्रसिद्ध गॉथिक चर्च मिस करेन. बस आणि ट्रेन मध्ये नसलेली गर्दी मिस करेन. या गोष्टी अनुभवण्याच्या...
आठवेल काय काय ?
पटापट बदलणारे ऋतू आठवतील. लख्ख वाटणारे पण प्रत्यक्षात गारेगार असणारे ऊन - धोकाधूप आठवेल. समोरच्या झाडावर पक्षांनी घरटं बांधायला सुरूवात केलीसुद्धा ! कोवळ्या पालवीची पानं होतील नि ते घरटं झाकून जाईन. मग थोड्या दिवसांनी पक्षी पिलांना भरवण्यासाठी येरझारा घालताना दिसती. मग अचानक एक दिवस रिकामे घरटे दिसेल. म्हणजे पानगळ सुरू झाली तर.. असे वाटून उदास वाटेतोवर फॉल कलर्स उधळले जातील.
त्या आधी उन्हाळ्यात रात्री दहासाडेदहापर्यंत असणारे ऊन, सायकलवर फिरणारे निरोगी घोळके, फुटबॉलचा जल्लोष, जवळपासच्या देशांमध्ये आखलेल्या सहली, भटकण्याच्या आणि खादाडीच्या कार्यक्रमांनी गच्च भरलेले वीकेन्ड्स आणि आइस्क्रीम किंवा कोल्ड कॉफी घेत कललेल्या संध्याकाळी.. हे सगळं आठवेलच..
खरं तर हे वर सांगितलंय ते किती निष्क्रीय आयुष्य आहे ! ते आता मागे पडणार.
आता काम करायचं.
भारतात आल्यावर करण्याच्या गोष्टींची यादी या वरच्या गोष्टींपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. युरोप फिरून झाला. जवळपास १२ देशांमध्ये जाऊन किमान एकेक शहर-गाव तरी बघून झाले. पण माझा देश अजून राहिलाच आहे. देश बघायचा.
अर्धवट सुटलेलं समाजकार्य पुढे चालू करायचं. नव्याने बनलेल्या मित्रांना गुरुकुलम ची माहिती सांगताना थोडं अडल्यासारखं होतंय ते गुरुकुलमशी प्रत्यक्ष संपर्क नसल्याने. हे नाही चालणार.
इकडे येताना तिथले मित्र जसे होते ते आता बदललेले असणार. त्यांची लाइफस्टाईल, प्राधान्यक्रम बदललेले असणार असं मनाला वारंवार बजावतेय. त्यांच्याशी पुन्हा एकदा जुळवून घ्यायचंय. त्यांच्या वाढलेल्या कुटुंबाशी मैत्री करायची आहे.
घराकडे लक्ष द्यायला हवं. रंग देणे आणि दोनचार कपाटं करणे हे आधी करायला हवं.
लेकीची शाळा सुरू होणार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट साजरी करायला हवी :)
चारपाच वर्षांच्या ब्रेकनंतर काम सुरू करायचं म्हणजे आधी धूळ झटकायला हवी. सायकॉलॉजीची पुस्तकं कोणत्या खोक्यात भरली आहेत बरं ?
इथल्या हावामान, राहणीमान आणि खानपानामुळे शारिरीक तंदुरुस्ती कुठच्या कुठे पळून गेलिये. आता ती परत कमवायची.
खूप झालं ना आता...
थोडक्यात काय, आता नवी विटी समोर दिसतेय !! :)

नव्या विटीच्या डावाला शुभेच्छा !!!!!!!
ReplyDeleteनव्या राजसाठी शुभेच्छा!
ReplyDeleteपुस्तकं कार्गोने पाठवता येतील मायदेशात :)
Dhanyavaad Vijay aani Gauri :)
ReplyDelete