Monday, 10 August 2020

अमोहाची डायरी 2

पुस्तक दिनाच्या शुभेच्छा मंडळी !
मी अमोहा. मला आईबाबांना लोंबकळत रहायला फार आवडतं म्हणून ते मला फांदी म्हणून चिडवतात. पण मी आता 16 महिन्यांची म्हणजे नीटच मोठी झाल्याने मी चिडवण्याकडे दुर्लक्ष देते !  🤓
मला पुस्तकं खूप आवडतात. म्हणजे खेळायला आई किंवा बाबा असतील तरच खेळणी आवडते.बाबा ऑफिस गेला की आई तिचं काम होइपर्यंत मला माझी गाणी लावून देते. मग मी आईला सोडून देते आणि गाणी ऐकत पुस्तकं वाचते ! आपली आपली ! म्हणजे आई किंवा बाबाने ती गोष्ट आधीच सांगितलेली असते मी फक्त चित्र वाचते. 👧
ते ससुल्याचं पुस्तक आहे ना त्यात वेगळे वेगळे प्राणी हाताला कसे लागतात ते बघता येतं. त्यात ससा,कुत्रा,खारुताई असे मऊ मऊ लोक आहेत. 😍
ते बेडकाचं पुस्तक आहे त्यात सगळे प्राणी माझ्याशी बोलतात ! बेडूक,डुक्कर,घोडा,गाय,चिऊताई असे आपल्या आपल्या भाषेत बोलतात. माझ्याकडे अशी 4 पुस्तकं आहेत.😎
 तीन पुस्तकं आहेत त्यातली दोन पुस्तकं कापडी आहेत. म्हणजे कधी कधी ती पुस्तकं तोंडात घालायला, टोपी करायला,बुआ कुक खेळायला मला फार आवडतं! आणि तिसरं पुस्तक प्लॅस्टिकचं आहे. मी आंघोळ करताना त्याला पण आंघोळ घालते! मज्जा! 🤗
अजून खूप पुस्तकं आहेत. पण त्यांच्याबद्दल सांगायचा मला आता वेळ नाही. मराठी,इंग्रजी आणि डच एवढी पुस्तकं आवरून ठेवायला सांगितलं आहे बाबाने. त्याची मीटिंग झाली की तो मला नवं पुस्तक देणारे 😀

२३-एप्रिल-२०२०






No comments:

Post a Comment