प्रवास कोणताही असो. सोबत दशम्या धपाटे घेतल्याशिवाय निघायचं नाही हा नियम मराठवाड्यात जवळपास सगळ्या घरांमध्ये पाळला जायचा. सामानात वरच सहज हाताला येईल असं पांढऱ्या सुती कापडात बांधलेलं दशमीचं गाठोडं ठेवलेलं असल्याचं. खाजगी वाहन हा प्रकार फार कमी वापरला जायचा. लाल बसमध्ये बसलं की अर्ध्या तासात डिझेलचा वास, खिडकीतून भरारा लागणारं ऊनकट वारं, पांढऱ्या मातीचा म्हणजे फुफाट्याचा वास हे सगळं मिश्रण एवढं भारी व्हायचं की आम्हाला भूक लागली असं वाटायचं! मग बसमधल्याच एखाद्या कोपऱ्यातून लोणच्याचा वास अलगद दरवळत यायचा. आता मात्र खरंच भूक लागायची.
आई दशमीचं गाठोडं वर काढायची. त्यात दुधातल्या दशम्या आणि ताकाचे धपाटे छोटीशी चळत करून त्यावरच एका कागदात किंवा प्लास्टिक तुकड्यात चटणी लोणचं असं काय काय बांधलेलं असायचं.एकेक दशमी हातात त्यावरच लोणचं किंवा चटणी किंवा ठेचा किंवा भुरका ! आजोळच्या दशम्या तिळाचा लसूण घातलेलं भुरका घेऊन यायच्या आणि गावाकडच्या चिंचेच्या ठेच्यासोबत! एरवी तिखटाची नाटकं करणाऱ्या आम्हाला यातलं काहीही तिखट लागायचं नाही! खिडकीतून बाहेर बघत नेहमीपेक्षा चार घास जास्तच खाल्ले की मग पटकन हात धुवून आम्ही पेंगायला मोकळे !
गंमत अशी की प्रवासभर बसमध्ये असे वेगवेगळ्या लोकांचे शिदोरीचे वास घमघमतच रहायचे. प्रवास कितीही लहान दोनतीन तास जरी असला तरी बसमध्ये दशमी खाणं हे सिनेमा बघायला गेल्यावर पॉपकॉर्न खाण्याएवढंच हौशी असायचं ! लाडू चिवडा वगैरे कितीही खाऊ सोबत असला तरी दशमी ती दशमी.
आजही प्रवास आणि दशमी हे असोसिएशन डोक्यात फार पक्कं आहे. कुठेही फिरायला जाताना तिथं मिळेल ते खायचं असं कितीही ठरवलं तरी किमान एक वेळच्या दशम्या सोबत घेतल्याशिवाय प्रवासाची तयारी पूर्ण झाली असं वाटतंच नाही.
दशम्या खूप प्रकारच्या असतात.त्यात आमच्याकडे सगळ्यात जास्त होणारा प्रकार म्हणजे ज्वारी किंवा बाजरीची निरशा दुधात केलेली खमंग खुसखुशीत दशमी. घरी दूध दुभतं भरपूर असल्याने दुधाचा वापर सढळ हाताने व्हायचा. निरसं दूध आणि ज्वारी किंवा बाजरीचं पीठ एवढंच चांगलं मळून घेऊन थापून चुलीवर भाजलेल्या दशमीची चव अद्वितीय असते.
अशीच कणकेची दशमी करायची. पोळीपेक्षा जरा जाडसर लाटून शांतपणे भाजायची. बरेच लोक दूध तूप पाणी किंचित साखर घालून उकळून घेतात आणि त्यात कणिक मळून दशम्या करतात. त्याही छानच लागतात. मला मात्र सवयीने आमच्या घरच्या निरशा दुधातल्या दशम्या जास्त आवडतात.
दुधाच्या कोणत्याही दशमीच्या मीठ नाही घालायचं. धान्याचा आणि दुधाचा गोडवा मोडायचा नाही. आणि अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे ज्वारी बाजरीची दशमी तव्यावर टाकताना पिठाच्या बाजूने टाकायची. वरून भाकरीसारखा पाण्याचा हात फिरवायचा नाही.
या दशम्या दोन तीन दिवस टिकतात.
उन्हाळ्यात ऊसाच्या रसात दशम्या व्हायच्या. ऊसाच्या रसात कणभर मीठ आणि कणिक घालून घट्ट मळून घायचं. मग तूप लावून जाडसर दशम्या भाजायच्या. केळीच्या दशम्या आणि लिंबाचं लोणचं हा मुलांचा आवडता खाऊ!
काकवीमध्ये कणिक मळून अशाच टिकाऊ दशम्या होतात.
धपाटे हा दुसरा खास प्रकार. ज्वारीचं पीठ,थोडं डाळीचं पीठ ओवा तिखट मीठ हळद घालून आंबट ताकात मळून भाकरीसारखं थापून किंवा ओल्या कपड्यावर थापून तेलावर छान परतून भाजून घ्यायचं. सोबत दाण्याची चटणी !
वाळूक, काकडी, टरबुजाची साल पांढरा भाग किसून त्यातच पिठं मळून केलेले धपाटे हे ही फार छान होतात.
यासोबत आमच्याकडे होतो तो खास चिंचेचा ठेचा! हिरव्या कच्च्या चिंचा घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तव्यावर तेलात परतून घ्यायच्या. थोडे जिरे घ्यायचे, हवा तर लसूण मिर्चीसोबतच परतून घ्यायचा आणि हे सगळं मीठ घालून एकत्र वाटून घ्यायचं. ठेचा तयार. खायला घेताना वर कच्चं तेल घ्यायला विसरायचं नाही. ठेचा दशमी प्रवासातलं कम्फर्ट फूड आहे.
हे दशमीमहात्म्य घेऊन सासरी आले आणि त्यात सुंदर भर पडली. उखरी आणि गाकर !
तेल किंवा तूप घालून मीठ घालून कणिक मळून घ्यायची. मग हातावरच छोटा गोळा मळत मळत छोटी चांदकी हातावरच थापून घ्यायची. ती तव्यावर कोरडी होईस्तोवर भाजली की निखाऱ्यावर टाकायची. खरं तर निखारे असतील आणि कॉन्फिडन्स असेल तर थेट निखाऱ्यावर भाजायची !!! मस्त टम्म फुगून येते. नीट भाजली की तूप घालायचं आणि गरमगरम खायला घ्यायची. सासूबाईंच्या हातची उखरी आणि खोबऱ्याची,जवस,कारळ,तीळ,शेंगदाणे यापैकी एक चटणी,वाटीभर दूध ही आमच्याकडे आवडती न्याहारी आहे.
या घरातल्या सुगरणी गाकर एवढं छान लावतात की पूर्ण जेवण झालेलं असतानाही कुणी गाकर विचारलं तर मी सहज खायला बसेन!
गाकर म्हणजे गव्हाची भाकर असं म्हणत असले तरी तंत्र जरा वेगळं आहे. पोळीला मळतो तशी कणिक कणीभर मीठ जास्त टाकून चांगली मऊ मळून घ्यायची. मग लोखंडी तव्यावर हात ढिला सोडून तेल पसरून घ्यायचं. त्यावर साधारण दोन पोळ्या होतील एवढा उंडा घ्यायचा. आणि थालीपीठ करतो तसा थापायचा. पूर्ण पसरला की तेलाचा हात लावून पुन्हा दुमडून पुन्हा थापायचा. असं जितक्या वेळा कराल तेवढं गाकर जास्त पदर सुटलेलं आणि खुसखुशीत होईल. मग छिद्र पाडून त्यात तेल घालून झाकण ठेवायचं. चुर्र आवाज आला की झाकण काढून गाकर उलट बाजूने भाजून घ्यायचं. आता गाकर तयार आहे. सोबत काय ? भुरका, चटणी,झुणका,पिठलं, लिंबाचं लोणचं, येसर,तूप,मेतकूट, घट्ट वरण, भाजी असं काहीही घ्या. छानच लागतं!
हा प्रकार करताना मी थोडी भर घालते. घडी घालण्यासाठी नुसतं तेल लावण्याच्या ऐवजी मेतकूट किंवा हवे ते मसाले किंवा लोणच्याचा खार किंवा चटणी लावते. प्रवासात न्यायला फार सोयीचं होतं. वेगळी चटणी घ्यायची गरज नसते.
याचं सँडविच पण मस्त होतं.
कोणत्याही पंजाबी ग्रेव्ही असलेल्या भाजीसोबत खायला नान कुलचा या ऐवजी गाकर हा उत्तम पर्याय आहे. गार झाल्यावर वातड होत नसल्याने डब्यात न्यायला पण छान. अर्थात गरम गाकरची सर याला येत नाही.
फ्रीजमध्ये उरलेली सैल झालेली कंटाळवाणी कणिक, पुरणपोळी करून उरलेली मऊ पातळ कणिक याचं गाकर लावून बघा.
पटकन गरम काही खायचं असेल, कुणी अचानक जेवायला आलं असेल, वेगळं काही खायचा मूड असेल, पोळ्या करायचा कंटाळा आला असेल आणि धिरडे घालत गॅससमोर उकडत बसायचं नसेल तर गाकर लावायचं. एकीकडे जेवणाची बाकी तयारी करायची. दोन दोन पोळ्यांच्या ऐवजी एकेक गाकर पोटभर होतं.
आमच्याकडे माझ्या मामेसासूबाई (सुषमा कुलकर्णी) फार छान गाकर करतात. त्या खालोखाल माझा नवरा उत्कृष्ट गाकर करतो. मला अजून त्यांची इयत्ता गाठायची आहे.
व्हिडीओ केलाय. त्यात माझ्या हातून नेहमीप्रमाणे तेल कमी पडलंय! फोटोमधले गाकर नवऱ्याने लावलेले आहेत. ते हवं तेवढं तेल वापरून केलेले आहेत.
करून बघा आणि सांगा आवडले का नाही !

No comments:
Post a Comment