आषाढी एकादशी म्हणजे बाहेर भुरभुरता पाऊस, शाळेच्या डब्यात साबुदाणा उसळ. प्रत्येकीच्या डब्यात वेगळ्या चवीची ! लाल तिखट घालून, मिर्ची घालून, काकडी घालून,बटाटा घालून, दाण्याचा कूट न घालता भरड शेंगदाणे घालून....!
घरी भगरीची दशमी,थालीपीठ, दही,रताळ्याच्या काचऱ्या, शेंगदाणा आमटी,लाडू,आणि दही साबुदाणा साखर ! ताक,आमरस, चिक्की, उपासाचे पापड चकल्या,खजूर केळी पपई वगैरे आहेच !!!
या सगळ्यांपेक्षा वेगळी गोष्ट सासरी आल्यावर खाल्ली ! गाठोडी !!!
आधी एक आठवण सांगते. तीन चार वर्षांपूर्वी एका आजारी आजींना भेटायला जायचं होतं. नव्वदी ओलांडलेल्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तरीही प्रसन्न आजी ! दोन आठवडे झाले काहीच खायला जात नाहीये असं ताई सांगत होती. काहीतरी खाऊ न्यायचा म्हणून मी आमच्या शेतातून आलेल्या राजगिऱ्याची गाठोडी करून नेली!
त्या आजीना सांगितलं तर एवढ्या आनंदल्या ! म्हणाल्या माया,अगं माझ्या लहानपणी माझी आई आणि आजी करायच्या ही गाठोडी ! कशी विसरले होते काय माहीत ! अगदी ती चव आठवली !!!
खूप समाधान वाटलं. ताई म्हणाली पंधरा दिवसांनी असं नीट मन लावून चवीनं काहीतरी खाल्लं त्यांनी !!! नंतर थोड्याच दिवसात आजी गेल्या. त्यांच्या लहानपणीचा खाऊ माझ्या हातून खाल्ला हे जाणवलं आणि भरून आलं!
परवा इथं ग्रोसरी घेताना चक्क अख्खा राजगिरा दिसला !! जवस,तीळ,राळे या सुपरफूड च्या रांगेत दिमाखाने इंग्रजी नाव मिरवत स्वतःचं भरमसाठ मोल सांगत तो उभा होता! मोह आवरला नाही म्हणलं माया,उचल ते गाठोडं !!! आणि घेऊन आले.
पारंपरिक पदार्थांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वगैरे बघायची सवयच नसते आपल्याला. राजगिरा सुपरफूड का आहे बरं म्हणून बघायला गेलं तर थक्क झाले. हजारो वर्षे जुनं धान्य आहे. ग्लुटन फ्री म्हणून लेबल पण दिसलं!
Amaranthus is a cosmopolitan genus of annual or short-lived perennial plants collectively known as amaranths. Some amaranth species are cultivated as leaf vegetables, pseudocereals, and ornamental plants. Most of the Amaranthus species are summer annual weeds and are commonly referred to as pigweeds.
Energy: 371.4 Calories (per 100 g)
Protein: 14 g (per 100 g)
Calcium: 159 mg (per 100 g)
Iron: 7.6 mg (per 100 g)
Potassium: 508 mg (per 100 g)
Scientific name: Amaranthus
पूर्वी आमच्या भागात भगर आणि राजगिरा पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं. घरोघरी वर्षभरात येणाऱ्या शंभरेक उपासाच्या दिवसात भगर आणि राजगिरा या स्वतःच्या शेतातून येणाऱ्या धान्यावर भर असायचा.
अशा या सोन्याच्या दाण्याचे अनेक प्रकार केले जात.राजगिरा लाह्या,भाजणी,भगरीसोबत दळून दशम्या, थालीपीठ, उपमा,शिरा,खीर,गाठोडी,लाडू ! अनेक तऱ्हा!
आमच्या घरी अजूनही हे सगळे प्रकार होतात. पण याचा डोळस वापर वाढायला पाहिजे असं वाटलं. आमच्या शेतात आम्ही गेली काही वर्षे घरच्यापुरता राजगिरा लावायला सुरुवात केली आहे.
या पदार्थाला गाठोडी हे नाव का पडलं नक्की माहीत नाही. पण बहुदा एखाद्या वारकऱ्याने वारीत चालत असताना शिदोरीत असलेली पुरचुंडी पाण्यात उकडून ते चवीचं गाठोडं वाटून खाताना हे नाव दिलं असावं!!
एखाद्या पदार्थानं किती पौष्टिक आणि किती साधं असावं त्याचं हे उदाहरण! खसखशीपेक्षा जरा मोठा दाणा ! हातात घेतला तर वाळूसारखा सुळसुळत बोटांतून निसटून जाईल! वास घ्या...मातीच्या वासाशी नातं सांगेल!
तर हा गुणी राजगिरा स्वच्छ धुवून एका स्वच्छ कापडात घालून पाणी निथळून घ्यायचं. पाणी निथळलं की त्याचं घट्ट गाठोडं बांधायचं. मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं. पाण्याला उकळी आली हे अख्ख गाठोडं त्यात शिजायला ठेवून द्यायचं. गाठ पक्की असली पाहिजे.
साधारण अर्धा तास ते उकडून झालं की गाठोडं बाहेर काढून जरा गार होऊ द्या. मग ते सोडून एका पातेल्यात शिजलेला राजगिऱ्याचा गोळा मोकळा करायचा. मोकळा केला मस्त मातकट वास घमघमतो !!!
आता त्यात गूळ घालायचा आणि कपभर पाणी घालून गरम करत गूळ विरघळू द्यायचा. गाठोडी तयार आहे !
या प्रेमळ सात्विक गाठोडीला जरा ग्लॅमरस करायचं का? नाव बदलून? Ancient grain porridge किंवा amaranth porridge किंवा golden porridge किंवा gluten free golden porridge??
नाव काहीही द्या ते करताना मात्र या कृतीने करा.
जरा जास्तच साधं वाटत असेल तर सजावट करा.
एका पळीत तूप गरम करा त्यात बेदाणे काजू चारोळी घाला आणि ही फोडणी गाठोडीवर घाला.
मला ज्यात त्यात वेलची जायफळ घालायला आवडत नाही. राजगिऱ्याची एक मातकट चव असते, गंध असतो तो मोडायला नको वाटतं म्हणून मी वेलची जायफळ घालत नाही. तुम्ही घालू शकता.
यात दूध किंवा साय घालूनही खूप छान लागतं.
गोड चालत आवडत नसेल तर चक्क ताक मिर्ची आलं मीठ घालून पण छान लागतं.
उपसाव्यतिरिक्त ही खीर दलिया च्या बरोबरीने राजगिरा घेऊन करता येते. तेव्हा गाठोडी बांधायची गरज नाही.
ग्लुटन फ्री भात म्हणून पण खाता येईल.
व्हीगन खीर करताना नारळाच्या दुधात करता येईल.
राजगिरा,ओलं नारळ, खसखस, साबुदाणा,नारळाचं दूध अशी खीर पण चांगली लागेल.
राजगिऱ्याचे दाणे शिजवून फार फुगत नाहीत.आणि फार पाणीही आटत नाही त्यामुळे शक्यतो मोकळा म्हणजे कापडात न बांधता शिजवू नका.
शिजल्यावर राजगिरा चिकट होतो तो चिकटपणा गूळ दूध घातलं की अजिबात जाणवत नाही. एकाचवेळी मऊ आणि कुरुमकुरुम स्पर्श भारी वाटतो. रसगुल्ला खाताना येतो तसा आवाजही येतो !
कुकरमध्ये शिजवणार असाल तर घट्ट झाकणाच्या डब्यात दीडपट पाणी घालून शिजवा नाहीतर कुकरला चिकटून अर्धा वाया जाईल.
आज केलेली गाठोडी माझ्या दीड वर्षाच्या अमोहालाही खूप आवडली!
जी गोष्ट तिची आई आजी आवडीने खाते, पणजी खापरपणजी आवडीने खायची ती हिलाही आवडावी हा आनंद आणि एक रेसिपी पुढच्या पिढीकडे सोपवली याचं समाधान गाठोडीत बांधलंय !!!

No comments:
Post a Comment