आत्महत्या करायचा विचार डोक्यात येणं हे एक टोक झालं.समोर अंतहीन दरी असलेलं! त्या आधी आपल्या वागण्यातून,बोलण्यातून,न बोलण्यातून लोक जवळच्या माणसांना हे नैराश्य सांगायचा अटीतटीने प्रयत्न करत असतात.
कधी कधी हे पोचवण्याची शक्ती कमी पडते. कधी कधी जवळच्याच लोकांकडून अशा वागण्याला 'आत्मकेंद्री वर्तन, लक्ष वेधून घेण्यासाठी केलेल्या गोष्टी' असं लेबल दिलं जातं.
त्याने नैराश्याची दरी अजून काळोखी होत जाते. मनातली असुरक्षितता त्याला गाळात खेचत राहते.
सतत स्ट्रॉंग राहण्याच्या,दाखवण्याच्या नादात माणूस कोरडा कोरडा होत जातो. जगायची इच्छा हळुहळू संपत जाते . मग एक दिवस सगळं अर्थहीन, पोकळ वाटू लागतं आणि असा टोकाचा निर्णय घेतला जातो.
प्रिय,
तुम्ही नैराश्याशी लढत असाल तर तुम्ही खूप शूर आहात. कोणालाही न कळू शकणारं युद्ध मूकपणे लढत राहणं सोपं नाही. तुम्हाला मनापासून नमस्कार !
यात जेव्हा केव्हा खूप शीण येईल,शक्ती कमी पडतेय असं वाटेल तेव्हा हाक मारा! आपण मिळुन त्याबाबत काहीतरी करू.
जगणं नाकारणं हा स्वतःवर, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांवर, अवलंबून असणाऱ्या लोकांवर फार मोठा अन्याय आहे. तो तुमच्या हातून घडू नये म्हणून काळजी घ्या!
फक्त एक हाक मारा !!!!
तुमच्या जवळचं कोणी असं या आजाराशी लढत असेल तर सतत त्याच्या सोबत रहा. नुसतं सोबत राहून चालत नाही तर ते सतत सांगत रहा. आपल्याच गाळात अडकलेली डिप्रेशन मधली व्यक्ती आपोआप तुमचं प्रेम समजू शकत नाही. तेवढी शक्तीच तिच्याकडे उरलेली नसते. हे समजून घ्या. काळजी घ्या.
कोणत्याही प्रकारची हाक असली तरी आधी ओ द्या. कोण जाणे कोण कसं कुठल्या कड्यावर उभं राहून हाक मारत असेल!!!!

No comments:
Post a Comment