युरोपियन लोक तसे शिस्तप्रिय ! आपली दिनचर्या, ऋतुचर्या त्यांना फार प्रिय असते. आमचं गाव पण त्याला अपवाद नाही. मेकलीन हे बेल्जियम मधलं बऱ्यापैकी टुरिस्ट आकर्षित करणारं लहानसं शहर आहे. गावातून फिरताना जुन्या इंग्रजी सिनेमातल्या शहरातून किंवा ओपन म्युझियम मधून फिरल्यासारखं वाटतं असं लोक म्हणतात !
तर सांगत होते,गावातल्या वेगवेगळ्या चर्चच्या दर तासाला एकाच वेळी होणाऱ्या घंटानादावर सगळ्यांचा दिवस बेतलेला. सोमवार ते शुक्रवार भरपूर काम, शनिवारी बागकाम,घरकाम आणि मुख्य काम बाजार !
एरवी ठराविक वेळा सोडल्या तर रस्ते रिकामे,आवाज फक्त वाहनांचे, आणि बाजार दुकानं इ ठिकाणी तुरळक लोकांची कुजबूज एवढंच काय ते ! शनिवारी मात्र चित्र वेगळंच असतं. आमचा आठवडी बाजार !
आपल्याकडच्या एखाद्या गावाची जत्रा असावी तसा हा बाजार भरलेला असतो. आजूबाजूच्या गावातून भाज्या फळं घेऊन आलेले शेतकरी, मासे;मांस विक्रेते, शंभरेक प्रकारचे चीज आणि लोणी विकणारे, फुलं विकणारे ( फुलं ही इथली जीवनावश्यक गोष्ट आहे) पाच पन्नास प्रकारचे ब्रेड;केक; बिस्किटे विकणाऱ्या गावातल्या प्रसिध्द बेकरीज, सुका मेवा; ऑलिव्हची लोणची, तऱ्हेतऱ्हेच्या कॅण्डीज आणि चॉकलेट्स विकणारे लोक, छत्री पासून जॅकेटपर्यंत सर्व प्रकारचे कपडे अर्थात ऋतूनुसार विकणारी दुकानं, पाळीव पक्षी; प्राणी यांचे लाड करण्याच्या गोष्टी, हरमाल एक युरो वाले छोटे दुकानदार,कार्पेट गादी उशी पांघरूण विक्रेते, अँटिक वस्तू विकणारे,भांडी विकणारे, अत्तर तेलं, ग्रीटिंग कार्ड्स विकणारे, स्वस्त पर्स बेल्ट पाकिटं विकणारे,बागकाम साहित्य बियाणे रोपं विकणारे, खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारे आणि गरमागरम ताजे पॅन केक, वाफल्स समोर करून देणारे असे एवढ्या प्रकारचे ट्रक ठरलेल्या ठिकाणी लागलेले असतात. मुख्य शॉपिंग स्ट्रीट वरची दोन्ही बाजूची ब्रँडेड दुकानं पण नेहमीपेक्षा जास्त फुललेली असतात. गावचे लाडके आईस्क्रीम पार्लर आणि फ्रीटूर्स म्हणजे फ्रेंच फ्राईज ची दुकानं लोकांनी वेढून टाकलेली असतात.
गावकरी पिशव्या,चाकाच्या बॅग्स,बास्केट घेऊन नटून थटून खरेदीसाठी फिरत असतात. वर्षानुवर्षे ठराविक शेतकऱ्याकडून खरेदी करताना गप्पा मारत असतात. ओळखीचे लोक एकत्र कॅफेमध्ये रेस्टॉरंट मध्ये ( खरं तर बाहेरच कारण यांना उघड्या आभाळाखाली खुर्च्या टाकून बसायला फार आवडतं!) खात पीत बसलेले असतात. त्यातही खास आमच्याकडचे प्रसिद्ध फ्रेंच फ्राईज !!!!
हौशी किंवा गरजू कलाकार वाद्य वाजवत लोकांचे मनोरंजन करत मिळेल त्या रिकाम्या जागी उभे असतात.लोकही मुद्दाम थांबून त्याच्या सोबतीने गाऊन नाचून समोरच्या टोपीत थोडेतरी पैसे टाकून जात असतात. सगळीकडे आनंदी उत्साही लगबग! चैतन्याने रसरसलेली हवा! कितीही थंडी पाऊस वारं बर्फ पडलेला असला तरी या चित्रात फक्त लोकांचे कपडे ऋतूनुसार बदलतात बाकी काहीही बदलत नाही!
आठवडाभर माणसं बघायला आतुरलेले आम्ही लेकीला घेऊन न चुकता या बाजारात जातो. ताज्या फळं आणि भाज्यांबरोबर काहीतरी खाऊ घ्यायचा. नदीकाठी असलेल्या बाकड्यावर बसून किंवा ऐन बाजारात असलेल्या पार्क मध्ये तळ्याकाठी बसून खात खात माणसं बघायची हा खूप आनंदी अनुभव असतो.
अशा गर्दीत फिरून आलं की नेहमीच छान वाटतं. आनंदी वाटतं. इथल्या आयुष्यात या आठवडी बाजाराला आमच्या दृष्टीने फार महत्वाचं स्थान आहे.
गेले साडेतीन महिने मी अशा बाजारात गेले नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून तर प्रश्नच नव्हता. पण परवाच्या शनिवारी राहवलं नाही. आता आम्हाला फिरायची परवानगी पण आहे. लॉक डाऊनच्या या टप्प्यात जी दुकानं उघडली तिथे व्यवस्थित रांगा करून लोक सामान घेत होते. रस्त्यावर फिरायला आलेले लोक मास्क लावून होते. जी दुकानं सोमवारी उघडणार तिथे दार बंद करून साफसफाई करत असलेले लोक काचेतून हसून अभिवादन करत होते.
पण तो शनिवार बाजार नव्हताच. अजून महिनाभर तरी तो सुरू होणार नाही. शहरातल्या या ठिकाणांना कधीच एवढं रिकामं बघितलं नव्हतं. आता नवीन नॉर्मल जगात आधीच्यासारखा बाजार असणार नाही हे अजून पचवता येत नाही. कसं चित्र असेल याची कल्पना करून बघावी वाटत नाही. येताना सत्तरी ओलांडलेलं एक ओळखीचं जोडपं भेटलं. रोलाँ सांगत होता की तो काहीतरी आणायला बाजारात गेला आणि 20 जणांची रांग बघून परत आला. आता हे असंच सगळीकडे असणार या कल्पनेने तो आणि त्याची बायको मोनीक खूप अस्वस्थ झालेले दिसत होते.
वरवर सगळं ठीक होईल असं वाटत असलं तरी सगळंच बदलतंय !
काही बदल थेट अनुभवातूनच मनात झिरपतात तसंच हे ही व्हावं!
हे काही फोटो या दिवसांची आठवण म्हणून काढलेत.

No comments:
Post a Comment