Monday, 22 June 2020

भरजरीत साकल्यसूक्त 🙊

अतिशय भरजरीत शब्दकळा असलेल्या पण निरर्थक कविता लिहिता येणं हे एक थोर कौशल्य आहे. तशा कविता वाचायला खूप जणांना आवडतं. मला पण आवडतं.
असंच झगमगीत लिहिणाऱ्यामिसळपाव.कॉम वर शरदिनी या आय डी च्या कवितांची मी फॅन होते. 😇 ( कुणी त्यांच्या संपर्कात असेल तर प्लिज हे पोहोचवा)
 त्यांच्यासारख्या वाचायला भारी वाटणाऱ्या पण अजिबात अर्थबोध न होणाऱ्या किंवा ज्याला जो अर्थ हवा तसा काढू देण्याचे स्वातंत्र्य असलेली कविता लिहिणं हे आव्हानच !! एकदा खूप प्रयत्न करून लिहिलेच ! ती ही कविता! 😛
काल चं प्र देशपांडे सरांनी निरर्थक कवितांचा खेळ सुरू केला होता तिथे दाखवली तर ते अत्युत्तम म्हणाले !!! म्हणजे कविता खरंच निरर्थक आहे यावर शिक्कामोर्तब झाले !!! 🤓🤓🤓
म्हणलं अशी प्रेरणा आपणही कवितालेखनाभिलाषी मित्रमैत्रिणीना द्यायला पाहिजे !! 😜
                           साकल्यसूक्त (म्हणे🙊)
              समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार
              गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार
                उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे
                वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे
              संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा
               अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा
              नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची
              जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची
               साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी
                हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी
               निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी
               पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी
                अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई
                अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!
( Please please please मला याचा अर्थ विचारायला येऊ नका !!!)

No comments:

Post a comment