Monday 22 June 2020

पाण्याकाठचं घर ७

पॉपीची फुलं संपत आली असं म्हणत शेवटच्या सुकत चाललेल्या फुलांना कॅमेऱ्यात टिपत होते. कालव्याच्या काठावर, बागांमध्ये वाढलेल्या तणामध्ये, भिंतीच्या पायथ्याशी वाऱ्याने जमा झालेल्या मातीत, भंगार होऊन पडलेल्या कारच्या खाली, थडग्यांच्या मधून असलेल्या पायवाटेच्या काठावर, भर रहदारीच्या रस्त्याच्या कडेला, पदपथावर उडालेल्या एखाद्या फरशीच्या जागेवर अशी कोणत्याही सांदीकोपऱ्यात तितक्याच उत्फुल्ल रंगात उमलणारी ही फुलं !!! रक्तवर्णी ! कितीही विपरीत परिस्थिती असली तरी अभिमानाने आणि आनंदाने मान उंच करून जगाकडे बघणारी !!!
 या फुलांना इथं चिरनिद्रेचं प्रतीक समजतात. विशेषतः देशाचं रक्षण करत सीमेवर रक्त सांडणाऱ्या सैनिकांची आठवण म्हणून या फुलांकडे बघतात. पहिल्या महायुद्धात बेल्जियमच्या या भूमीवर थडग्यांच्या रांगा बघत एका सैनिकाने केलेली ती जगप्रसिद्ध कविता गेला आठवडाभर मनात रेंगाळते आहे. भूमी कोणतीही असली तरी सैनिक,त्याच्या मनात असलेली आपल्या देशाविषयीची भावना, नागरिकांना त्याच्याबद्दल असणारी कृतज्ञता या गोष्टी जगात सार्वकालिक आणि सारख्याच असतात हे पुन्हा जाणवलं !

In Flanders fields the poppies blow
Between the crosses, row on row
That mark our place; and in the sky
The larks, still bravely singing, fly
Scarce heard amid the guns below.
We are the Dead. Short days ago
We lived, felt dawn, saw sunset glow,
Loved and were loved, and now we lie
In Flanders fields.
Take up our quarrel with the foe:
To you from failing hands we throw
The torch, be yours to hold it high.
If ye break faith with us who die
We shall not sleep, though poppies grow
In Flanders fields.
- Lieutenant Colonel John McCrae








No comments:

Post a Comment