उन्हाळ्यातल्या रात्री गच्चीवर किंवा अंगणात अंगतपंगत करताना, झणझणीत, जळजळीत जेवणाच्या शेवटी पोटात गारवा आणण्यासाठीचा माझा आवडता मेनू...
साहित्यः
भात
दही
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप.
कृती:
१ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा.
थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे.
फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालावी.
थोडी तिखट चव हवी असल्यास फोडणीसाठी गरम केलेल्या तेलात वाळलेली लाल मिर्ची किंवा तळणी मिर्ची तळून घावी. ती कुस्करून भातात घालावी.
हा भात थोडावेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यावा. जास्त छान लागतो. :)
फक्त हेच जेवण असेल तर मी यात किसलेली काकडी पण मिसळते. आणि पाहुण्यांसाठी असेल तर कोथिंबीरी सोबत डाळिंबाचे दाणे पेरून सजवते.
काल कोथिंबीर आणि डाळिंब घरात नव्हते म्हणून साधाच केला. त्याचा फोटो तुमच्यासाठी.. :)
No comments:
Post a Comment