Monday, 14 June 2010

वैचारिक आजार

काही आजार शरीराचे;काही मनाचे तर काही दोन्ही चे मिळुन असे माहित होते. या पलिकडे जाऊन काही 'वैचारीक आजार' असतात असे एका संशोधनात सिद्ध झालं आहे म्हणे !(संशोधक जिवाच्या भितीने लपुन बसलाय) त्या संशोधनात काही तथ्य आहे असे आमच्याच काही मित्रमंडळीकडे पाहुन पटायला लागलंय.. :?

माझा एक मित्र आहे.त्याला वै.जुलाबाचा आजार आहे! कोणताही विषय त्याला ऐकू आला कि सुरु झालेच म्हणुन समजा ! नव्या रेसिप्यांपासुन अणुकरारापर्यंत कोणताही विषय याला'पचत'नाही.पोटात काही म्हणुन ठरत नाही! कितीही चांगलं याला द्या;अंगी काही लागत नाही.विचार,विषय कितीही जड असू द्या;याच्या कानातून आत शिरतो,काही क्षणात तोंडातून बाहेर्!तेही डोक्यात घाईघाईत झालेल्या प्रक्रियेसह! :NO

एक मैत्रिण याच्या विरुद्ध. वै.बद्धकोष्ठता आहे तिला.म्हणजे डोक्यात खूप असतं हो,बाहेर पडण्याची मारामार!!! चर्चा,विनोद्,चेष्टा असे पाचक ही काही परिणाम करत नाहीत्. एक चांगलं आहे हिचं..कुणीही तिच्यासमोर कितीही जड विषयावर बड्बडू श़कतों. नजिकच्या भविष्यकाळात तरी बाहेर काही पडणार नाही याची खात्री असते.

एकीला वै.अ‍ॅलर्जी आहे.पथ्यपाणी कडक!न चालणारा विषय निघाला कि पुरळ उठते. डोके ठणकायला लागते.खाज सुट्ल्याने ती वेडीपिशी होते!एक तर ती प्रचंड स्त्री मुक्तिवादी(दोन्ही) आहे. त्यामुळे कुठल्याही वयाच्या पुरुषांबद्द्ल चांगले बोलले की ही ताप चढल्यासारखी त्या जातीबद्द्ल'अन्याय..अत्त्याचार्.'.असे भाषण सुरू करते! तिच्या अशा आजाराला घाबरून मी तेंडुलकरचंही कौतूक तिच्यासमोर करत नाही. e:

काहींची अवस्था याहून वाईट. वै.बधिरता! कोणत्याही विषयाचा पोत्,स्पर्श यांना जाणवतच नाही. मग तो विषय दाहक असो की मोरपिशी..त्यांच्या कातडीवरचा केसही हलत नाही.सुखी जीव नाही!

हे झाले मोठे आजार.सर्दी पडश्या सारखे किरकोळ आजार आप्ल्यातुप्ल्याला पण होतातच की. म्हणजे बघा,एखाद्या विषयावर इथे खूप लोक पेटलेत असे दिसले की विषय कोणताही असो..मतांच्या शिंका येणारंच! :)

बाकी वैचारिक गतिमंदता,वै.स्थूलता,वै.कावीळ ही नावे तुमच्या कल्पनाशक्तीसाठी सप्रेम भेट :D

1 comment:

  1. Concept masta hota, Vaicharik aajar!
    Apale likhan mala khup avadale.

    ReplyDelete