भोवताली मृगजळ
दृष्टी नभी खिळलेली
माझी रिकामी ओंजळ
धुक्यानेच भरलेली....
आस थोड्याशा तेजाची
आस थोड्या प्रकाशाची
आस मोठ्या आभाळाची
आस किती आसावली ! ....
स्वप्न थोडेसे वेगळे
मला आभाळाचे पिसे
सूर्य पापण्या मिटून
माझ्या याचनेला हसे
दान हवे जखमांचे
दान खर्या आसवांचे
दान विशाल दु:खाचे
दान मोठ्या पदराचे...
तुझे केवढे आकाश !
देई सोनेरी आशीष
माझी ओंजळ भराया
किती असा अवकाश
दान घाली पदरात
आस माझ्या प्राणातली
माझी ओंजळ अजुनी
धुक्यानेच भरलेली....
दृष्टी नभी खिळलेली
माझी रिकामी ओंजळ
धुक्यानेच भरलेली....
आस थोड्याशा तेजाची
आस थोड्या प्रकाशाची
आस मोठ्या आभाळाची
आस किती आसावली ! ....
स्वप्न थोडेसे वेगळे
मला आभाळाचे पिसे
सूर्य पापण्या मिटून
माझ्या याचनेला हसे
दान हवे जखमांचे
दान खर्या आसवांचे
दान विशाल दु:खाचे
दान मोठ्या पदराचे...
तुझे केवढे आकाश !
देई सोनेरी आशीष
माझी ओंजळ भराया
किती असा अवकाश
दान घाली पदरात
आस माझ्या प्राणातली
माझी ओंजळ अजुनी
धुक्यानेच भरलेली....
No comments:
Post a Comment